Scheme: शासनाच्या 'या' 6 योजना झटपट मिळवून देतील उद्योग व्यवसायासाठी कर्ज

Scheme: तुम्हाला कमी किमतीपासून मोठ्या किमतीचे कर्ज मिळू शकते.
Scheme
SchemeDainik Gomantak

Scheme: आपल्यापैकी अनेकांना नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असते. पण नवीन व्यवसाय सुरुवात करण्यासाठी पैशांची गरज लागते. अशा स्टार्टअप किंवा सुरु असलेल्या उद्योग व्यवसायांना पैशाची मदत करण्यासाठी सरकारने काही योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांचा फायदा व्यवसायिकांना होऊ शकतो.

१. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही प्रामुख्याने महिला उद्योजक, सेवा आणि व्यापाराशी संबंधित उद्योग इत्यादींसाठी उपयुक्त आहे. यामध्ये कर्जदाराला परतफेडीचा कालावधी वाढवण्याची सुविधा मिळते. या योजनेची महत्वाची बाजू अशी आहे की, तुम्हाला कमी किमतीपासून मोठ्या किमतीचे कर्ज मिळू शकते. कर्जाचे तीन प्रकार दिसून येतात.

१. शिशू मुद्रा कर्ज- या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज 1 ते 2 टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाते.

२. किशोर मुद्रा कर्ज- या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 8.60 ते 11.15 टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाते.

३. तरुण मुद्रा कर्ज- या योजनेअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 11.15 ते 20 टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाते.

२. क्रेडिट गॅरंटी फंड योजना

CGTMSE (मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट) बऱ्याच काळापासून MSME ला तारण मुक्त कर्ज सुविधा देत आहे. CGTMSE योजनेतंर्गत कोणतेही तारण न घेता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.

३. एमएसएमई कर्ज योजना ( MSME )

सूक्ष्म, लघू आणि मध्यम व्यवसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी सरकारने एमएसएमई कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, कोणताही नवीन किंवा आधीपासूनच सुरु असलेले उद्योग 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो.

साधारणपणे, कर्ज प्रक्रियेला अंदाजे 8-12 दिवस लागतात आणि कर्ज अर्ज मंजूर होण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी फक्त 59 मिनिटे लागत असल्याचे म्हटले जाते.

४. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना

या योजनेअंतर्गत दोन प्रकारचे कर्ज दिले जाते

मार्केटिंग सहाय्य योजना: तुमची स्पर्धात्मकता आणि तुमच्या ऑफरचे बाजार मूल्य वाढवण्यासाठी तुम्ही या योजनेतील निधी वापरू शकता. यामुळे व्यवसायाची जाहिरात, विपणन आणि बाजारपेठेतील पोहोच वाढविण्यात मोठी मदत होऊ शकते.

क्रेडिट सहाय्य योजना: या योजनेअंतर्गत कच्चा माल खरेदी, वित्त, विपणन इत्यादीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.

५. क्रेडिट-लिंक कॅपिटल सबसिडी योजना

हे व्यवसायांसाठी सरकारी अनुदानित क्रेडिट आहे जे उद्योगांमधील तांत्रिक प्रगतीसाठी निधीची गरज असलेल्यांसाठी चांगले आहे. तांत्रिक प्रगतीमध्ये विपणन, पुरवठा साखळी, उत्पादन इत्यादींचा समावेश असू शकतो.

Scheme
रिलायन्स रिटेलमध्ये येणार दुबईतून पैसा, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी करणार 50 अब्ज रुपयांची गुंतवणूक

६. SIDBI कर्ज

SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सरकारी व्यवसाय कर्ज देणारी ही सर्वात जुनी संस्था मानली जाते. प्रामुख्याने छोट्या व्यवसायांना मदत करणे हा सिडबी कर्ज देण्याचा मुख्य उद्देश आहे. ज्यांना पैशाची नितांत गरज आहे त्यांना या कर्जाद्वारे मदत केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com