Drowning Dainik Gomantak
Video

Dudhsagar River: दूधसागर नदीत अंघोळीसाठी उतरला, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह; वास्कोतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Youth Drowns in Dudhsagar River: फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मडगाव येथील इस्पितळात नेण्यात आला.

Sameer Panditrao

फोंडा: ताकार - दावकोण येथील दूधसागर नदीत गुरुवारी संध्याकाळी उशिरा आंघोळीसाठी पाण्यात उतरलेला अनिल बाळेगाळ (३२, वास्को) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी पाण्यात आढळून आला. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मडगाव येथील इस्पितळात नेण्यात आला.

गुरुवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत नदीत आंघोळ करताना अनिल बाळेगाळ हा युवक बुडाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला, पण रात्रीची वेळ असल्याने शोधकार्य बंद करण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून पर्यटकांना नदीत उतरण्यास बंदी घालावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.सकाळी पुन्हा शोध घेतली असता त्याचा मृतदेह सापडला. कुळेचे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT