Betalbatim Elderly Father Assault Dainik Gomantak
Video

VIDEO: CCTV मध्ये कैद संतापजनक प्रकार! बेताळभाटी येथे वयोवृद्ध पित्याला मुलाकडून चपलेने मारहाण, लंडनहून मुलीची पोलिसांकडे तक्रार

Betalbatim Elderly Father Assault: बेताळभाटी येथे ८५ वर्षीय वयोवृद्ध लॉयला डिसोझा यांना त्यांचा मुलगा इजिदोर डिसोझा आणि सून तेरेजा गोन्साल्विस यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: बेताळभाटी येथे ८५ वर्षीय वयोवृद्ध लॉयला डिसोझा यांना त्यांचा मुलगा इजिदोर डिसोझा आणि सून तेरेजा गोन्साल्विस यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

ही घटना ८ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. घरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पीडित वृद्धाची लंडनमध्ये वास्तव्यास असलेली मुलगी मारिया डिसोझा हिने सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कोलवा पोलिसांकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, तिच्या भावाने आणि भावजयीने आसहाय्य वडिलांना हाताने तसेच चपलेने मारहाण केली. वृद्धत्वामुळे त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. या घटनेमुळे त्यांना शारीरिक दुखापतींसह मानसिक धक्काही बसला असून ते भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोलवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत इजिदोर डिसोझा व तेरेजा गोन्साल्विस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

SCROLL FOR NEXT