Sattari Cyclone Dainik Gomantak
Video

VIDEO: दहा मिनिटांचा खेळ अन् होत्याचं नव्हतं झालं! सुरंगुली, शिरसोडेतील घरांना चक्रीवादळाचा मोठा फटका

Sattari Cyclone: खोतोडा-सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील सुरुंगुली व शिरसोडे गावात बुधवारी (25 मार्च) रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान दहा मिनिटांच्या आलेल्या चक्रीवादळामुळे तब्बल 15 घरांचे नुकसान झाले.

Manish Jadhav

खोतोडा-सत्तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील सुरुंगुली व शिरसोडे गावात बुधवारी (25 मार्च) रात्री 10.30 वाजण्याच्या दरम्यान दहा मिनिटांच्या आलेल्या चक्रीवादळामुळे तब्बल 15 घरांचे नुकसान झाले. यावेळी जोरदार वादळी वारा गडगडाटासह सुरु झाला तसेच काहीशा गाराही पडल्या. त्यामुळे सुरुंगुली गावातील श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानच्या सभामंडपाचे अर्धे छप्पर उडून गेले, तसेच गावातील घरांची कौले, पत्रे यांचे नुकसान होऊन लोकांना आर्थिक फटका बसला.

या घटनेमुळे बुधवार रात्रभर गावात वीजपुरवठाही खंडित झाला. या घटनेत सुरुंगुली गावातील प्रेमनाथ गावकर, राजेश गावकर, सुरेश गावकर, चंद्रकांत गावकर तर शिरसोडे गावातील संदीप गावकर, सुरज गावकर, मंगेश पर्येकर, आप्पा केरकर यांच्या घरांचे नुकसान झाले. चक्रीवादळात घरांची छपरे उडाली तर सुरेश गावकर, आपा केरकर यांच्या घरांवर झाड कोसळून नुकसान झाले. तसेच, केळी पिकांच्या बागायतीलादेखील मोठा फटका बसला. यावेळी गाराही कोसळल्या. दुसरीकडे, शिरसोडे गावात वीज सुरळीत झाला, पण सुरुंगुलीत अजूनही वीज खंडित होता. दरम्यान, सध्या तलाठ्यांमार्फत झालेल्या नुकसानीची पाहणी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT