Colvale Accident Dainik Gomantak
Video

Colvale Accident: भरधाव कारच्या धडकेत मायलेकी जखमी, कोलवाळ येथील घटना; कारचालकास अटक

Tar Colavale Accident: जखमी माय-लेक या जीए ०३ एएस ८३३० क्रमांकाच्या दुचाकीवरून कोलवाळहून नादोडा येथे घरी जात होत्या. तर विरुद्ध दिशेने रेवोड्याहून जीए ०३ एएफ ३८३० क्रमांकाची बालेनो कार येत होती.

Sameer Panditrao

Colvale Car Accident

म्हापसा: तार-कोलवाळ येथे कारने दुचाकीला ठोकल्याने झालेल्या अपघातात कडशाल-नादोडा येथील दुचाकीस्वार झरीना डिसोझा (४३) व त्‍यांची मुलगी लेरिसा डिसोझा (१३) गंभीर जखमी झाली. या अपघातास कारणीभूत कारचालक आकाश लिंगुडकर (२३, रा. माडेल-थिवी) यास पोलिसांनी अटक केली.

हा अपघात आज मंगळवारी सांयकाळी साडेसातच्‍या सुमारास घडला. जखमी माय-लेक या जीए ०३ एएस ८३३० क्रमांकाच्या दुचाकीवरून कोलवाळहून नादोडा येथे घरी जात होत्या. तर विरुद्ध दिशेने रेवोड्याहून जीए ०३ एएफ ३८३० क्रमांकाची बालेनो कार येत होती. तार-कोलवाळ येथे दुचाकी पोहोचताच भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघीही रस्त्यावर कोसळल्या व गंभीर जखमी झाल्‍या. कारच्या दर्शनी भागाखाली दुचाकी अडकली. अपघातानंतर कारमधील दोघांनाही पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाने एकाला पकडून चोप दिला तर दुसरा निसटण्यास यशस्वी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात दारु आणि सलूनच्या दुकानांवर झळकले पाकिस्तान जिंदाबादचे फलक; गुन्हा दाखल

Goa Hotel Guidelines: मद्यपान केलेल्या ‘गेस्ट’ना नीट हाताळा! पर्यटकांना मारहाणीचा मुद्दा; पोलिसांचे ‘20 कलमी नियम’ जारी

Valvanti Chikhal Kalo: 'हरी रे माझ्या पांडुरंगा'! वाळवंटीकाठी रंगला चिखलकाला, बालगोपाळांत संचारला उत्साह Video

Ravi Naik Tribute: 'रवी नाईक' गोमंतकीयांसाठी होते जननेते! मडगावचो आवाजतर्फे ‘रिमेंबरिंग पात्रांव’ शोकसभा

Sarmanas Ferry: 15 वर्षांपूर्वी बुडाली फेरीबोट, कार दुर्घटना; सारमानस फेरीधक्का बनतोय मृत्यूचा सापळा

SCROLL FOR NEXT