Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

Sudin Dhavalikar Supporters: खोटे आरोप करणाऱ्यांना तूच कडक शिक्षा कर! मगोप्रेमींची कटमगाळ दादाचरणी विनवणी Video

Pooja Naik Cash For Job: पूजा नाईक हिने वीजमंत्री ढवळीकर यांच्यावर सरकारी नोकऱ्या विकल्याचा आरोप केल्यामुळे तिच्या वक्तव्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.

Sameer Panditrao

फोंडा: जॉब स्कॅमप्रकरणी पूजा नाईक हिने मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध करून मगोपप्रेमी कार्यकर्ते तसेच हितचिंतक यांनी फर्मागुढी येथील कटमगाळ दादा महाराजांना गाऱ्हाणे घातले. त्यानंतर मडकईतील देवी नवदुर्गा मंदिरातही गाऱ्हाणे घालून या खोट्या प्रकरणात जे कुणी गुंतले आहेत त्यांना योग्य शिक्षा मिळावी, अशी मागणी केली.

यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. ‘ज्यांनी समाजातील कमकुवत घटकांना मदतीचा हात देऊन त्यांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला, ते मगोपचे नेते, मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर जॉब स्कॅमप्रकरणी खोटे आरोप करणाऱ्यांना तूच कडक शिक्षा कर’ असे गाऱ्हाणे मगोपचे कार्यकर्ते तसेच मगोपप्रेमी नागरिकांनी रविवारी कटमगाळ दादा आणि मडकई येथील देवी नवदुर्गेला घातले.

पूजा नाईक हिने वीजमंत्री ढवळीकर यांच्यावर सरकारी नोकऱ्या विकल्याचा आरोप केल्यामुळे तिच्या वक्तव्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. हे गाऱ्हाणे घालतेवेळी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. त्यात मगोप कार्यकारिणी सदस्य तसेच जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य आणि मगोपप्रेमी नागरिकांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT