Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

Goa Politics: 'मगो' सोडून गेलेल्यांची स्थिती काय आहे? ढवळीकरांचा जीतना टोला; राजकीय निष्ठेबद्दल 'दामूंचे' अभिनंदन

Sudin Dhavalikar: मगो पक्षात निवडून येऊन इतर पक्षांत गेलेल्यांची स्थिती सध्या काय आहे, हे सर्वांना माहीत आहे, असा टोला वीजमंत्री ढवळीकर यांनी मारला.

Sameer Panditrao

Sudin Dhavalikar About Jeet Arolkar

फोंडा: मगोच्‍या कार्यकर्त्यांनी जीत आरोलकर यांना निवडून दिले असून ते मगोतच राहतील. ते कोठेही जाणार नाहीत. मगो पक्षात निवडून येऊन इतर पक्षांत गेलेल्यांची स्थिती सध्या काय आहे, हे सर्वांना माहीत आहे, असा टोला तथा इशारा मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारण्‍याचा प्रयत्‍न केला.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांचे आपण अभिनंदन करतो. आपल्‍या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्‍यामुळेच त्‍यांना हे पद मिळाले. त्‍यामुळे दामू नाईक यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना महत्त्व देण्याऐवजी पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेऊन पक्षकार्य वाढवावे, असा सल्ला ढवळीकर यांनी दिला. ऐनवेळी ‘ऑफर’ देऊन पक्षाशी निष्ठा असणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण केले जाते, असा आरोपही त्‍यांनी केला.

सुदिन ढवळीकर, (मगो)

आपण गेली ५० वर्षे मगो पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. अनेक ऑफर्स आल्या, पण बधलो नाही. मगो पक्षातून मोठे झालेल्या अनेकांनी हा पक्ष सोडून इतर पक्षांची कास धरली. पण त्‍यांची स्‍थिती आता काय आहे? म्‍हणूनच दामू नाईक यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या राजकीय निष्ठेबद्दल अभिनंदन करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT