shripad naik news Dainik Gomantak
Video

"भंडारी समाज संघटित राहिल्यास काहीही साध्य करू शकतो" - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

Shripad Naik on Bhandari Community: समाजातील सर्वांनी संघटनात्मक बळावर एकत्र राहिल्यास हा समाज गोव्यात कोणतीही उद्दिष्टे साध्य करू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले

Akshata Chhatre

साखळी: भंडारी समाज हा गोव्यात मोठा समाज असून, समाजातील सर्वांनी संघटनात्मक बळावर एकत्र राहिल्यास हा समाज गोव्यात कोणतीही उद्दिष्टे साध्य करू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्री रूद्रेश्वर देवस्थान समिती आणि श्री रूद्रेश्वर रथयात्रा समितीतर्फे आयोजित गोव्यातील सर्व भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी भंडारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी पर्वरी हाऊसिंग बोर्ड येथे भूखंड मिळवून भव्य वसतिगृह उभारण्यासाठी समितीने पत्रव्यवहार करावा, असे आवाहन केले.

मंत्री श्रीपाद नाईक यांनीही कोणतेही भेदभाव न ठेवता सर्वांनी संघटितपणे काम केल्यास समाज निश्चितच प्रगती करेल, असे सांगितले. या सोहळ्यात राज्यभरातील भंडारी समाजातील जिल्हा पंचायत सदस्य, पंचसदस्य आणि नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT