SGPDA Decisions Dainik Gomantak
Video

SGPDA मासळी मार्केटचे लवकरच उदघाटन! पे पार्किंग तसेच सोपो कर वाढीला मान्यता; निविदेसाठी 3 कोटी बोली रक्कम

SGPDA Meet: एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटमधील विक्रेते सोपो म्हणून केवळ दिवसा १० रुपये प्रत्येक चौरस मिटर जागेसाठी देतात. एवढ्या रकमेत मार्केटची देखभाल होत नाही.

Sameer Panditrao

SGPDAMeet

सासष्टी: एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट इमारतीचे दोन तृतीयांश काम पूर्ण झाले असून पुढील १५ दिवसांत या इमारतीचे उद्‍घाटन केले जाईल, अशी माहिती एसजीपीडीएचे चेअरमन तथा वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

तसेच सोपो गोळा करण्याचे कंत्राट ३१ जानेवारीपर्यंत दिले जाईल. यापूर्वी जाहीर केलेल्या निविदेत काही त्रुटी होत्या, त्या सरकारकडून दुरुस्त केल्या आहेत. त्या निविदेची बोली 4 कोटी होती, आता निविदेची बोली ३ कोटी ठरवण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत निविदा जाहीर केली जाईल.

ढवळी, फोंडा इथे एसजीपीडीएचे ३६ भूखंड आहेत. या भूखंडाचा लिलाव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १५ ते २० भूखंडाचा लिलाव केला जाईल, अशी माहिती साळकर यांनी दिली.

आयनॉक्स समोरील एसजीपीडीएच्या जागेत वाहने पार्क केली जातात मात्र शुल्क आकारण्यात येत नाही. आता या ठिकाणी एका तासाला १० रुपये व संपूर्ण दिवस वाहन पार्क केल्यास ५० रुपये आकारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.

एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटमधील विक्रेते सोपो म्हणून केवळ दिवसा १० रुपये प्रत्येक चौरस मिटर जागेसाठी देतात. एवढ्या रकमेत मार्केटची देखभाल होत नाही. त्यामुळे यात वाढ करण्यासाठी विक्रेत्यांकडे चर्चा करून शुल्क निश्र्चित केले आहे. शुल्क वाढीची ही फाइल मान्यतेसाठी सरकारकडे पाठवली आहे, अशी माहिती साळकर यांनी दिली.

या बैठकीला मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई, इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

SCROLL FOR NEXT