Margao sewage issue Dainik Gomantak
Video

Margao: मडगावात सांडपाणी वाहिनीचे 75 टक्‍के काम पूर्ण; कामत यांनी घेतली बैठक

Margao sewage issue: मडगावात केवळ ७५ टक्‍के सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे समोर आले. हे काम पूर्ण करण्‍यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्‍न करण्‍याची गरज व्यक्त आली.

Sameer Panditrao

Margao sewage pipeline

मडगाव: येथील सांडपाणी वाहिनीचे चार पंप बंद पडल्‍यामुळे कित्‍येक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार दिगंबर कामत यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

यावेळी मडगावात केवळ ७५ टक्‍के सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे समोर आले. हे काम पूर्ण करण्‍यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्‍न करण्‍याची गरज व्यक्त आली.

काही दिवसांपूर्वी कोंब येथे या वाहिनीतील सांडपाणी रस्‍त्‍यावरून वाहू लागल्‍यामुळे अडचण निर्माण झाली होती. प्रसार माध्‍यमांवरुनही हा प्रश्‍न गाजला होता. त्‍यामुळे ही बैठक घेण्‍यात आली. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्‍पाचे चार पंप बंद पडल्‍यामुळे ही स्‍थिती उद्‍भवली आहे.

हे पंप दुरुस्‍त करण्‍यासाठी आदेश दिले आहेत. मात्र तोपर्यंत ज्‍या ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहते त्‍या ठिकाणी नाईट सॉईल टँकर तैनात केले असून त्‍याद्वारे रस्‍त्‍यावर पसरणारी ही घाण साफ केली जाईल, असे कामत यांनी सांगितले.

मडगावच्‍या न्‍यू मार्केट परिसरात कित्‍येक वेळा आग लागण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. अशी कुठलीही दुर्घटना घडल्‍यास तात्‍पुरती मदत मिळावी यासाठी या मार्केटात पाण्‍याचे चार हायड्रंन्‍टस्‌ बसविण्‍यात येणार असून यासाठी ७७ लाख रुपये खर्च करण्‍यात येतील, असे कामत यांनी सांगितले.

या बैठकीला दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस तसेच अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीनेत कोठवाळे हे उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT