Ajit Kerkar Passes away Dainik Gomantak
Video

Ajit Kerkar Passes away: ज्येष्ठ रंगकर्मी अजित शेणवी केरकर यांचे निधन

Senior theatre artist Ajit Shenvi Kerkar passes away: अजित शेणवी केरकर यांचे शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Sameer Amunekar

फोंडा: फोंड्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते तसेच कला मंदिरचे माजी उपाध्यक्ष अजित शेणवी केरकर यांचे शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७४ वर्षे होते.

रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्र आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अनेक वर्षे मोलाचे योगदान दिले. कला मंदिरच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनामुळे फोंडा परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक तसेच मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्यावर आज, शनिवार दि. ६ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित शेणवी केरकर यांच्या निधनाने फोंड्यातील सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT