sattari thane godhemodni  Dainik Gomantak
Video

Ghodemodni: सत्तरी ठाणेची फामाद 'सातभाव घोडेमोडणी' Video

Sattari Thane Godmodni: मंडळगिरो व कोळगिरो हे देवस्थान नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येऊन नवस व्यक्त करतात व तो याच दिवशी फेडतात.

Sameer Panditrao

वाळपई: गोमंतकाच्या सांस्कृतिक व पारंपरिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या सत्तरी तालुक्यातील ठाणे गावातील सात भावांची श्री देव मंडळगिरो-कोळगिरो स्थळावर साजरा होणारा त्रैवार्षिक घोडेमोडणी उत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात झाला.

उत्सवाच्या दिवशी संपूर्ण परिसर भाविक व नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. सात गावांतील घोड्यांची हातभेट झाल्यानंतर ठाणे पंचायत क्षेत्रातील पंचायत इमारतीसमोरील मंडळगिरो-कोळगिरो मैदानावर हजारो भाविकांच्या साक्षीने चौदा घोड्यांचा पारंपरिक नृत्यप्रकार सादर करण्यात आला. या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या सोहळ्यात पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी उपस्थित राहून घोड्यांची पूजा केली.

मंडळगिरो व कोळगिरो हे देवस्थान नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येऊन नवस व्यक्त करतात व तो याच दिवशी फेडतात. त्यामुळे देवदर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पहाटे घोड्यांचा नृत्याविष्कार सादर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT