Samiksha Naik Shiroda Home Dainik GOmantak
Video

Samiksha Naik: ..जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ! शिरोड्यातील वृद्धेच्या घर दुरुस्तीसाठी मदतीचा ओघ; Video

Samiksha Naik Shiroda Home: शिरोडा येथील समीक्षा नाईक या महिलेच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती करून देण्यासाठी समाजकार्यकर्ते शिवप्रसाद शिरोडकर तसेच ‘मगो’चे संकेत मुळे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: हळदय वाजे-शिरोडा येथील समीक्षा नाईक या ६० वर्षीय महिलेच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती करून देण्यासाठी समाजकार्यकर्ते शिवप्रसाद शिरोडकर तसेच ‘मगो’चे संकेत मुळे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

माकडाने छपरावर उडी घेतल्याने तसेच एका झाडाची फांदी कोसळल्याने छप्पर कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त ‘गोमन्तक टीव्ही’ वाहिनीतून प्रसारित झाले होते. त्याची दखल घेऊन शिवप्रसाद शिरोडकर यांनी घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन समीक्षा नाईक यांना सोमवारी (ता.१६) सकाळी भेट घेऊन दिले आहे.

अनेकजण मदतीसाठी आले पुढे

शिरोडा मतदारसंघात मगो पक्षाचे कार्य पाहणारे संकेत मुळे यांनी सोमवारी सकाळी समीक्षा नाईक यांच्या घरी १० पत्रे पाठवून दिले आहेत. त्याशिवाय अन्य काहीजणांनी लवकरच वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी होकार दिला आहे. तसेच समाजकार्यकर्ते शिवप्रसाद शिरोडकर यांनी समीक्षा नाईक यांच्या घराची दुरुस्ती करण्याच्या कामाला मंगळवारपासून सुरुवात केली जाणार आहे, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT