Pernem Melava Dainik Gomantak
Video

गोवा चिरंतन ठेवण्यासाठी भाषाप्रेमींनी ऐक्‍य राखावे! पेडणे साहित्यिक स्‍नेहमेळाव्यात नायक यांचे प्रतिपादन

Pernem News: ‘मिशन फॉर लोकल’ आणि ‘त्रिसुपर्ण’ पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणे येथील बागायतदार सभागृहात आयोजित पेडणे तालुका साहित्यिक स्‍नेहमेळाव्याचे उद्‌घाटन केल्‍यानंतर नायक बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: साहित्यिक, विचारवंतांनी गोवा घडविला आहे. परंतु आज तो गोवा बिघडत चालला आहे. गोमंतकीयांनी भाषिक वादात न अडकता कोकणीबरोबर रोमी कोकणी आणि मराठीला राजभाषा करायला हवी. त्यामुळे कोणाचेच नुकसान होणार नाही, उलट भाषिक सलोखा टिकून राहील, असे प्रतिपादन ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले.

‘मिशन फॉर लोकल’ आणि ‘त्रिसुपर्ण’ पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणे येथील बागायतदार सभागृहात आयोजित पेडणे तालुका साहित्यिक स्‍नेहमेळाव्याचे उद्‌घाटन केल्‍यानंतर नायक बोलत होते.

यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, ज्‍येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ, साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, पत्रकार किशोर नाईक गावकर, ‘मिशन फॉर लोकल’चे अध्यक्ष राजन कोरगावकर, ‘त्रिसुपर्ण’चे निमंत्रक राजमोहन शेट्ये, चंद्रकांत सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेशवंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. चंद्रकांत सांगळे यांनी प्रास्ताविक केले तर राजन कोरगावकर यांनी स्नेहमेळाव्याचे प्रयोजन स्पष्ट केले. त्‍यांच्‍यासह राजमोहन शेट्ये, गुंडू राऊळ, चंद्रकांत सांगळे, उमेश गाड यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. डॉ. भक्ती महाजन, प्रिया टांगसाळी, सोनाली परब सावळ देसाई, साहिल नारुलकर यांनी सूत्रसंचालन केले. राजमोहन शेट्ये यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "भारताला चार गुजराती चालवतायेत, त्यापैकी दोन देश विकतायेत...'' हाय-होल्टेज सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

एक्झिट परमिट संपलं तरी भारतातच मुक्काम! 3 परदेशी नागरिकांवर कारवाई; म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये केली रवानगी

Budhaditya Rajyog 2026: कष्टाचं होणार सोनं...! बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; भाग्याचीही मिळणार साथ

IND vs PAK: पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणानं क्रिकेट फॅन्स 'क्लीन बोल्ड'; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी कोलंबोतील हॉटेल अन् तिकिटांचे दर गगनाला भिडले

Goa Politics: खरी कुजबुज; सावर्डे मतदारसंघात दोन भाजप गट?

SCROLL FOR NEXT