Sadetod Nayak Dainik Gomantak
Video

Sadetod Nayak: हिम्मत असेल तर गोव्याच्या जमिनी राखण्यासाठी कायदा आणून दाखवावा - डॉ.ऑस्कर रिबेलो

Oscar Rebello: गोव्याला सद्यःस्थितीत भाव अधिक आहे. प्रत्येकाचा डोळा गोव्याच्या जमिनीवर आहे. आम्ही जो हरित गोवा पाहिला तो येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळणे अतिशय कठीण आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्याला सद्यःस्थितीत भाव अधिक आहे. प्रत्येकाचा डोळा गोव्याच्या जमिनीवर आहे. आम्ही जो हरित गोवा पाहिला तो येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळणे अतिशय कठीण आहे. गोव्यातील जमीन सांभाळण्यासाठी प्रादेशिक आराखड्यांचा अभाव नसून आपल्या राजकारण्यांमध्ये असलेला दृष्टिकोनाचा अभाव याला कारणीभूत आहे.

गोव्याला दिल्लीकरांच्या जबड्यातून वाचवायचे असेल तर किमान संवेदनशील क्षेत्रातील जमीन रूपांतरित करता येणार नाही, असा कायदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात आणावा, असे परखड मत गोवा बचाव आंदोलनाचे डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी व्यक्त केले.

गोमन्तक टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक कार्यक्रमात डॉ. रिबेलो बोलत होते. या कार्यक्रमात समाजसेविका सबिना मार्टिन्स यांनीही सहभाग घेतला होता. डॉ. रिबेलो म्हणाले की, राजकारण्यांना भव्य इमारती उभारायच्या आहेत, गोव्याला पुणे, बंगळूर बनवायचे आहे ना, तर अवश्‍य उभारा परंतु त्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधांची तजवीज पहिल्यांदा करा, इमारती बांधल्या, तरी जाण्यासाठी रस्ता नाही, पाणी नाही अशाने व्यवस्था बिघडेल व गोव्याचा विध्वंस होईल, असे त्यांनी सांगितले.

जातीयवाद, धर्मवादाचा फैलाव रोखणे आवश्‍यक : रिबेलो

आम्ही धर्म आणि जातीयवाद घेऊन बसलो आहोत. परंतु गोव्याची जमीन, हरित वाढीसाठी कोणीच राबत नाही. कोणताच राजकीय पक्ष समोर येत नाही. धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्ष आणि राजकीय नेत्यांचा गोव्याच्या हानीत वाटा आहे. जनता निवडून देते एका पक्षात आणि नंतर आमदार दुसऱ्याच पक्षात जातो. आज सरकारमध्ये पर्यावरणाविषयी गांभिर्याने विचार मांडणारा एकही नेता आपल्याला दिसत नाही. आम्ही खरेतर ओडीपी, प्रादेशिक आराखडा म्हणत केवळ चेहऱ्यावर आलेल्या मुरमावर भाष्य करीत आहेत परंतु खरा रोगा जातीयवाद, धार्मिकता यावर बोलतच नाहीत. गोव्यात जातीयवाद, धर्मवादाचा फैलाव वाढत आहे त्याला रोखणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रिबेलो यांनी व्यक्त केले.

संघटित लढा देणे गरजेचे : सबिना मार्टिन्स

सरकार जमीन रूपांतराला चालना देते, परंतु ते रोखायचे असेल तर आम्हाला न्यायालयाशिवाय कोणताच पर्याय उरत नाही. २०२१ ओडीपीत त्रूटी होत्या त्याच २०३१ मधील ओडीपीमध्ये आहेत. आता सरळ- सरळ नियमांमध्येच बदल केले जात आहेत. गोव्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. त्याविरोधात नागरिक मोठ्या प्रमाणात जमीन राखण्यासाठी पर्यायाने गोवा वाचविण्यासाठी आवाज उठवत आहेत. आपली जमीन, खाजन शेती, संरक्षण करायचे असेल तर गोवा वाचविण्यासाठी उठणाऱ्या आवाजांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे असल्याचे मत सबिना मार्टिन्स यांनी व्यक्त केले.

राजकीय ताकद कमी पडते!

रस्त्यावर उतरून आवाज उठवणे अतिशय सोपे असते परंतु आपण सविस्तर अभ्यास करून, न्यायालयात तक्रार करत गोवा सांभाळणे अतिशय कठीण काम असते जे गोवा फाउंडेशनचे क्लॉड आल्वारिस यांच्यासारखे करत आहेत. गोव्याच्या हितासाठी अनेकजण आवाज उठवतात, परंतु या आवाजाला राजकीय ताकदीत परिवर्तित करण्यास आम्ही कुठे तरी कमी पडत असल्याची खंत डॉ. रिबेलो यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT