Panaji Smart City, Rohit Monserrate Dainik Gomantak
Video

Panaji Smart City: ‘स्मार्ट सिटी’च्या कामांवर महापौरांची नाराजी

Rohit Monserrate: पोलिस मुख्यालयासमोरील रस्ता डांबरीकरणाचे काम झालेले नाही, हे लक्षात आणून देताच १५ दिवसांत डांबरीकरणाची निविदा काढली जाईल, असे महापौर म्हणाले.

Sameer Panditrao

पणजी: शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जावर सोमवारी नाराजी व्यक्त करणाऱ्या महापौर रोहित मोन्सेरात यांनी १ मे रोजी झालेल्या सर्व कामांची पाहणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. कारण मे अखेरपर्यंत गटार, रस्ते, पदपथाची कामे होतील, असे पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) यापूर्वीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे.

स्मार्ट सिटीच्या कामे वेळेत होत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याशिवाय जी कामे सुरू आहेत, त्या कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जी कामे सुरू आहेत, ती योग्य आहेत की नाहीत याचे निरीक्षण ‘आयपीएससीडीएल’च्या अभियंत्यांकडून होत नाही. कामे पूर्ण करण्याची जी मुदत दिली आहे, त्यामुळे १ मे रोजी झालेल्या कामांची तपासणी केली जाईल. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे १८ जून मार्गाचे काम बाकी आहे, त्या मार्गाखालूनच पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे गटारांची जोडणीची कामे झालेली नाहीत. त्याशिवाय या रस्त्याचे काम बाकी असल्याने काय समस्या उद्‍भवू शकतात, हेही तपासले जाईल. १८ जून रस्त्याचे काम न होण्यामागे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसते, असे महापौर यांनी सांगितले.

पोलिस मुख्यालयासमोरील रस्ता डांबरीकरणाचे काम झालेले नाही, हे लक्षात आणून देताच १५ दिवसांत डांबरीकरणाची निविदा काढली जाईल, असे महापौर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT