Mayem Jatrotsav Dainik Gomantak
Video

Redyachi Jatra Mayem: मयेची रेड्याची जत्रा उत्साहात साजरी

Mayem Jatrotsav: माल्या’च्या जत्रेपाठोपाठ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मये येथील प्रसिद्ध ‘रेड्या’ची अर्थातच व्हडली जत्रा उत्साहात साजरी झाली.

Sameer Panditrao

डिचोली: ‘माल्या’च्या जत्रेपाठोपाठ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मये येथील प्रसिद्ध ‘रेड्या’ची अर्थातच व्हडली जत्रा उत्साहात साजरी झाली. या जत्रेलाही ‘माले’ पेटविण्याची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे ते पेटविण्‍यात आले. माशेलमधील देवतांच्या तरंगांनी यंदा जात्रेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे जत्रेतील तरंगांची प्रथा खंडित झाली. तरी देखील अन्य पारंपरिक विधी पार पाडून मयेवासीयांनी ‘रेड्या’ची जत्रा परंपरेप्रमाणे साजरी केली.

मध्यरात्री सुरू झालेल्या या जत्रेची सोमवारी पहाटे हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता झाली. या जत्रेला मोठा इतिहास आहे. माशेल येथील श्री देवकीकृष्ण, श्री पिसो रवळनाथ आणि श्री कुलपुरुष या तरंगांशी ही जत्रा संबंधित आहे.

दरम्‍यान, जत्रेनिमित्त दुकानांची मोठी फेरीही भरली होती. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्‍‍न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

SCROLL FOR NEXT