Rama Kankonkar Dainik Gomantak
Video

Rama Kankonkar: रामा काणकोणकर हल्ला! पोलिसांची मोठी कामगिरी; अल्पावधीत 7 संशयित अटक; Watch Video

Rama Kankonkar Attack: करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अल्पावधीत मोठी कामगिरी करत सात संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी अल्पावधीत मोठी कामगिरी करत सात संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

गुरुवारी रात्री पाच संशयितांना अटक केली होती, तर आज शुक्रवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. सांताक्रुझ येथून फ्रान्को डिकोस्टा (२८, सांताक्रुझ) आणि म्हापसा बाजार परिसरातून अट्टल गुन्हेगार साईराज गोवेकर (२८, पिळर्ण) याला पणजी पोलिसांनी आज अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा अट्टल गुन्हेगार आणि एका गुन्हेगाराला अटक केली आहे. अद्याप हल्ला प्रकरणाचा हेतू स्पष्ट झाला नसल्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.

अटक केलेल्या संशयितांना पणजीच्या न्यायिक दंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

गुन्हा नोंद झाल्यानंतर उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आठ पथकांत ३१ कर्मचारी तैनात करून केवळ तीन तासांत सीसीटीव्ही फुटेज व पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींच्या आधारे सर्व संशयितांची ओळख पटली. त्यानंतर शोध मोहीम हाती घेऊन पोलिसांनी काल पाच व आज दोन अशा सातजणांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hamlet: इटलीत पोचला गोमंतकीय अभिनेता, शेक्सपियरचे 'हॅम्लेट' साकारतोय केतन; थिएटर हाऊसतर्फे प्रयोग केला सादर

Colva: कोलव्यातील दुकानदारांचे तात्पुरते स्थलांतर! पर्यटनमंत्री खंवटेंचे आश्वासन; पहिल्या टप्प्यात विविध सुविधांचा समावेश

First AI Minister: जगातील पहिली एआय मंत्री, संसदेत केले भाषण; भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी अल्बानियात टेक प्रयोग Watch Video

11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

भोपाळ ते गोवा जाणाऱ्या बसमध्ये सुरु होता अजब प्रकार; RTO अधिकाऱ्यांनी प्रवासी बनवून केला भांडाफोड

SCROLL FOR NEXT