Velsao railway track problems Dainik Gomantak
Video

Velsao: वेळसाव येथे रेल्वेच्या संरक्षक भिंतीमुळे स्थानिक संतप्त; पारंपारिक वाट अडवली जाण्याची भीती

Railway Double Tracking Velsao: रेलमार्ग दुपदरीकरण करताना वेळसाव येथे संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याने तेथील रहिवाशांची वाट अडविली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Sameer Panditrao

Velsao railway track problems

वास्को: रेलमार्ग दुपदरीकरण करताना वेळसाव येथे संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याने तेथील रहिवाशांची वाट अडविली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संरक्षक भिंतीमुळे वाहनांची ये-जा बंद होणार असल्याने आणीबाणीच्याप्रसंगी तेथे वाहन कसे आणावे, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

रेल्वे विकास निगमने तेथे कमीतकमी तीन मीटर्सचा रस्ता मोकळा सोडावा, अशी मागणी त्या रहिवाशांनी केली आहे. याप्रकरणी आपण कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांच्यासमोर प्रश्न मांडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रोकोझिन डिसोझा यांनी सांगितले.

वेळसाव येथे रेलमार्ग दुपरीकरणाला विरोध आहे. त्यामुळे तेथे वाद होत असल्याचे चित्र दिसते. मध्यंतरी तेथील झाडे बुलडोझरने मोडण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. तसेच तेथील एक शौचालय व इतर बांधकाम मोडल्याप्रकरणी तेथे तणाव निर्माण झाला होता. तेथील सीमांकनप्रकरणी सर्व्हे खात्याने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी २१ डिसेंबरला बैठक घेतली.

त्यानंतर परिस्थिती स्थिरावली अशी वाटत असतानाच आता रेल्वेने तेथे संरक्षक भिंत बांधण्याची तयारी सुरू केली आहे. या संरक्षक भिंतीमुळे तेथील कित्येक वर्षांची वाट अडविली जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

आमची घरे सुमारे ४०० वर्षांपूर्वीची आहेत. आम्हाला येण्याजाण्यासाठी ही वाट सोयीची ठरते. आता तेथे संरक्षक भिंत उभारण्यात आली तर आमचा एकंदर व्यवहार ठप्प होणार असल्याचे लोकांचे मत आहे.

लोकांना वाट महत्त्वाची!

हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार वाझ यांच्याकडे जाण्याची गरज होती. तथापि स्थानिक तेथील दोन व्यक्तींच्या नादी लागल्याने हा प्रश्न सुटू शकला नाही, असा दावा रोकोझिन डिसोझा यांनी केला. या रहिवाशांना नुकसान भरपाई नको; त्यांना पक्त ये-जा करण्यासाठी वाट पाहिजे, ती रेल्वेने देण्याची गरज आहे. त्यासाठी रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडे चर्चा करण्याची गरज आहे. रेल्वेकडे हा प्रश्न मांडला असता, तर त्यांनी नक्कीच याप्रकरणी तोडगा काढला असता. संरक्षक भिंत उभारल्यास दुसऱ्या बाजूस असलेल्या आरोग्य केंद्र, शाळा, चर्च इत्यादीकडे कसे जाणार, हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT