Omkar Elephant Dainik Gomantak
Video

Omkar Elephant: महाराष्ट्र की गोवा? गोंधळात पडलेल्या 'ओंकार' हत्तीकडून शेतीची नासधूस; Video

Elephant in Goa: महाराष्‍ट्रातील ओंकार हत्ती कळपापासून विभक्त झाल्‍यानंतर गोव्‍यात दाखल झाला. पेडणे परिसरातील काहीजणांच्‍या शेतीचीही त्‍याने नासधूस केली.

Sameer Panditrao

पणजी: गोवा-महाराष्‍ट्रातील सीमा भागात हेलपाटे मारणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला गोव्‍यातून महाराष्‍ट्रात घालविण्‍यासाठी गोवा वन खात्‍याकडून जोरदार प्रयत्‍न सुरू असतानाच, महाराष्‍ट्र वन खात्‍याचे सुमारे दहा कर्मचारी ‘ओंकार’ने महाराष्‍ट्रात प्रवेश करू नये, यासाठी सीमेवर मुक्‍काम ठोकून पहारा देत आहेत.

त्‍यामुळे ओंकारचा गोवा आणि महाराष्‍ट्रात पुरता फुटबॉल झाला आहे. महाराष्‍ट्रातील ओंकार हत्ती कळपापासून विभक्त झाल्‍यानंतर गोव्‍यात दाखल झाला. पेडणे परिसरातील काहीजणांच्‍या शेतीचीही त्‍याने नासधूस केली. त्‍यामुळे गोवा वन खात्‍याने या हत्तीला महाराष्‍ट्रातील दोडामार्ग भागामध्‍ये परतवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले; परंतु या हत्तीने गेले काही दिवस गोव्‍यातून दोडामार्ग आणि दोडामार्गमधून गोवा असा प्रवास सुरू ठेवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT