Navelim Gramsabha Dainik Gomantak
Video

Navelim: जमिनींच्या प्लॉटींगच्या मुद्द्यावर नावेलीची ग्रामसभा तापली, प्रक्रिया बंद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

Navelim Gramsabha: नागरिकांनी मांडपा येथे जमिनीचे वेगवेगळे भूखंड पाडण्याचे काम चालू आहे त्याबद्दल विचारणा केली. त्याचप्रमाणे झालर तळ्यासभोवताली कुंपण बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

Sameer Panditrao

सासष्टी: नावेली पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. काही नागरिकांनी मांडपा येथे जमिनीचे वेगवेगळे भूखंड पाडण्याचे काम चालू आहे त्याबद्दल विचारणा केली. त्याचप्रमाणे झालर तळ्यासभोवताली कुंपण बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

सरपंचांच्यावतीने पत्रकारांशी बोलताना सेबी गोम्स यांनी सांगितले, की मांडपा येथे जे भूखंड तयार केले जातात, त्यासंदर्भात पंचायतीच्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाईल. या भूखंडाची प्रक्रिया बंद करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बस थांबा नावेली चर्चकडे उभारण्यासाठी पंचायत प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

बेले सर्कलकडे पश्चिम बगल रस्त्यावरून अवजड वाहनांना जाण्यासाठी सूचना फलक लावण्यात येईल, असे सरपंचांनी सांगितले. पश्चिम बगल रस्त्यामुळे झालोर तळ्याची दुर्दशा झाली आहे. लोक त्यात कचरा आणून फेकतात. त्यामुळे सभोवताली असलेल्या शेतजमिनीला बाधा पोहोचत आहे. या तळ्यासभोवती कुंपण बांधण्याचा पंचायतीचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT