Narve, Masan Devi Jatra Dainik Gomantak
Video

Narve, Masan Devi Jatra: नार्वेतील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रेला उत्साहात सुरुवात

Masan Devi Jatra: तळेवाडा- नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रा आज (20 ऑगस्ट) (मंगळवारी) पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

Manish Jadhav

तळेवाडा- नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रा आज (20 ऑगस्ट) (मंगळवारी) पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ही जत्रा साजरी होते. या जत्रेला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. या जात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा फक्त दिवसाच साजरी करतात. रात्रीच्यावेळी या परिसरात भूतांचा वावर असल्याची भक्तांची भावना आहे. त्यामुळे काळोख पडू लागल्यानंतर याठिकाणी कोणीच थांबत नाही. दुकानांची फेरीही हटवली जाते. मसणदेवीची जत्रा गोव्यासह अन्य राज्यातही प्रसिद्ध आहे. यंदाही वेगवेगळ्या भागातील हजारो भक्तगणांनी श्री मसणदेवीचे दर्शन घेवून देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तगणांनी देवीच्या चरणी नवसही फेडले. जत्रेनिमित्त यंदाही खाजे, खेळणी, चणे आदी वस्तूंच्या स्टॉलांची फेरी भरली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागासह पोलिसही तैनात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT