Naru Disease Goa Dainik Gomantak
Video

Naru in Goa: नागझर-कुर्टी वाठारांत सांपडलो 'नारू' जंतू; Watch Video

Naru Disease Goa: नागझरी-कुर्टी येथे एका घराच्या बाहेर धुणीभांडी करण्याच्या जागेवर हा नारू सापडला असून आरोग्य खात्याने तो ताब्यात घेऊन पणजी मुख्यालयाला पाठवला आहे.

Sameer Panditrao

‘नारू’ हा गिनीवर्म नष्ट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर करूनही आता गोव्यात विशेषतः फोंड्यात गेल्या तीन महिन्यांत दोन ठिकाणी ‘नारू’ हा सुतासारखा जंतू सापडल्याने खळबळ उडाली आहे. नागझरी-कुर्टी येथे एका घराच्या बाहेर धुणीभांडी करण्याच्या जागेवर हा नारू सापडला असून आरोग्य खात्याने तो ताब्यात घेऊन पणजी मुख्यालयाला पाठवला आहे.

नागझरी-कुर्टी येथे ही महिला धुणीभांडी करीत असताना छोट्या पाण्याच्या टबात सुतासारखे काही वळवळत असल्याचे पाहून तिची घाबरगुंडी उडाली. या महिलेने त्यानंतर इतरांना ही गोष्ट दाखवली असता दोन नारू जंतू असल्याचे स्पष्ट झाले. फोंडा मार्केटमध्ये ही बातमी पसरताच आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन हे जंतू ताब्यात घेतले आणि नागझरीच्या ठिकाणी पाहणी केली.

नारू या जंतूची अंडी माणसाच्या पोटात गेल्यानंतर हा सुतासारखा जंतू तयार होऊन शेवटी तो पायाला जखम करून बाहेर पडतो. त्यामुळे नारू रोग झालेल्या रुग्णाला अतिशय त्रासदायक जीवन जगावे लागते. नारू शरीरातून बाहेर पडल्यानंतर रुग्णाची सुटका होते; पण तोपर्यंत त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

दरम्यान, खांडेपारनंतर कुर्टी भागात नारू सापडल्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवताना पाणी कुठेही साचू देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अशाच प्रकारचा जंतू इतरत्र सापडल्यास त्वरित आरोग्य खात्याला कळवावे, असे आवाहनही या खात्याच्या डॉक्टरांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: गोव्याशी भिडणार RCBचा कॅप्टन! रणजी करंडकमध्ये रंगणार थरार; 15 वर्षांनंतर चुरशीची लढत

Goa Politics: खरी कुजबुज; ही तर भाजप प्रवेशाची नांदी!

Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

Rajinikanth Honoured at IFFI: इफ्फीत थलैवा 'रजनीकांत' यांचा होणार विशेष सन्मान! चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT