Mumbai to Goa ferry Dainik Gomantak
Video

Mumbai To Goa Ro Ro Ferry: मुंबई ते गोवा फक्त 6 तासांत! समुद्रातून धावणार रो - रो फेरी; लवकरच सुरु होणार सेवा

Mumbai To Goa News Travel Service: रो - रो फेरीच्या माध्यमातून गोवा ते मुबंईला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एम २ एम या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

Pramod Yadav

मुंबई ते गोवा अंतर आता केवळ सहा तासांत पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास रेल्वे किंवा रस्ता मार्गाने होणार नसून तर हा प्रवास समुद्राच्या पाण्यातून होणार आहे. रो - रो फेरीच्या माध्यमातून गोवा ते मुबंईला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एम २ एम या कंपनीने पुढाकार घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रो रो फेरी सेवा लवकरच सुरु होणार असून, सध्या मुंबईत या जहाजाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

रो रो फेरी सेवा सुरु झाल्यास मुंबई ते गोवा अंतर केवळ सहा तासांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडले आहे. सध्या हे अंतर पूर्ण करण्यासाठी आठ ते दहा तासांचा वेळ लागतो. दरम्यान, रो रो सेवा सुरु झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

मंबईतून गोव्यासाठी विविध ट्रेन देखील धावतात, शिवाय एक वर्षापूर्वी गोव्यासाठी वंदे भारत ट्रेन देखील सुरु करण्यात आली आहे. पण, रो - रो सेवेमुळे प्रवाशांना आणखी एक प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय समुद्रातून प्रवासाचा आनंद देखील प्रवाशांना मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रो रो सेवा सुरु झाल्यास या फेरीची ६० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असण्याची शक्यता आहे. पण, यासाठी किती रुपये मोजावे लागतील याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान ही फेरी धावेल अशी प्राथमिक माहिती आहे. ही सेवा लवकर सुरु करण्यासाठी m2m कंपनी प्रयत्नशील असून, प्रवासी देखील याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या सेवेमुळे दोन्ही राज्यांना (महाराष्ट्र - गोवा) पर्यटनासाठी फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT