Advalpal Meeting Dainik Gomantak
Video

Advalpal: 'अडवलपाल' सभेतील गदारोळाला आमदार शेट्ये जबाबदार नाहीत; बदनामीचे षडयंत्र असल्याचा देवस्थानचा दावा

Advalpal Meeting: मंदिरासह आमची घरेदारे वाचवा अशी मागणी करीत कोळमवाड्यावरील लोकांनी गेल्या रविवारी गावात मूकमोर्चा काढून पंचायतीला निवेदन दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Advalpal Mine Belt Meeting Dispute

डिचोली: खाणीच्या विषयावरून अडवलपाल येथे खदखदलेल्या बैठकीस आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये अजिबात जबाबदार नाहीत किंवा त्यांना बैठकीतून कोणी पिटाळूनही लावले नाही, असे स्पष्टीकरण अडवलमधील श्री गोपाळकृष्ण देवस्थान समितीने आज सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

बैठकीतील गोंधळाचा बाहू करून आमदारांना बदनाम करण्याचे कोणाचे तरी षडयंत्र आहे. बैठकीत गदारोळ झाला, त्यावेळी आमदार डॉ. शेट्ये बैठकीतून गेले होते. बैठकीतील गदारोळासंबंधी जो कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे, असा दावा देवस्थानचे अध्यक्ष यशवंत नाईक आणि सचिव मयुर कळंगुटकर यांनी केला आहे.

या प्रकरणाचा निषेध करताना यापुढे कोणीही आमदारांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असेही देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेस देवस्थानचे खजिनदार रजत सराफ आणि महाजन विजय पाडलोसकर यांची उपस्थिती होती.

मानापमानावरून गदारोळ

मंदिरासह आमची घरेदारे वाचवा अशी मागणी करीत कोळमवाड्यावरील लोकांनी गेल्या रविवारी गावात मूकमोर्चा काढून पंचायतीला निवेदन दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याच रात्री कोळमवाड्यावरील गोपाळकृष्ण मंदिरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, निवेदनाबाबतीत अंधारात ठेवल्याचा दावा देवस्थान समिती आणि काही महाजनांनी करताच बैठकीतील वातावरण तापत गेले. या बैठकीस आमदार डॉ. शेट्ये यांना निमंत्रित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT