Maharashtra drought 2026 Dainik Gomantak
Video

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ

Maharashtra drought 2026: जूनमधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगामामध्ये ‘ट्रीगर-१’ लागू झालेल्या महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.

Sameer Amunekar

मुंबई: जूनमधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांमुळे मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगामामध्ये ‘ट्रीगर-१’ लागू झालेल्या महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक ७४ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहेत.

खरीप हंगामामध्ये पावसाची तूट आणि अन्य निकषांमुळे ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या २६५ तालुक्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. या तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे सुरू करून पीक परिस्थितीचे छायाचित्र व जीपीएस माहिती संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारने विविध सवलती आणि उपाययोजना लागू केल्या आहेत.

पीक परिस्थितीचा अहवाल देणार

कृषी आयुक्तांनी खरीप हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला. त्यामुळे आता या तालुक्यामध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांचा फटका बसलेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीबाबत दुष्काळाबाबतच्या ट्रिगर-१ (प्रथम कळ) अनुषंगाने पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आव्हानावर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने प्रयत्न करूया. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT