Lamgao Bicholim Leopard  Dainik Gomantak
Video

Bicholim News: लामगाव-डिचोलीत बिबट्याचा संचार; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Lamgao Bicholim: गेल्या दोन आठवड्यांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्याचा दावा रहिवासी करत होते. विष्णू जननायक यांच्या मालकीच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने घराच्या कुंपणात घुसून गंभीर जखमी केल्याची माहिती स्थानिक देविदास गोवेकर यांनी दिली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard At Lamgao Bicholim

मये: लामगाव डिचोली येथील रहिवाशांच्या विनंतीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी गावातील जंगलात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. डिचोली मधील लामगाव गावात बिबट्या दिसल्याची नोंद आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्याचा दावा रहिवासी करत होते. विष्णू जननायक यांच्या मालकीच्या पाळीव कुत्र्याला बिबट्याने घराच्या कुंपणात घुसून गंभीर जखमी केल्याची माहिती स्थानिक देविदास गोवेकर यांनी दिली होती. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची विनंती केली होती. स्थानिकांच्या विनंतीनंतर वनाधिकारी रश्मी मुळगावकर व इतरांनी रविवारी सकाळी लामगाव गावाला भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करून पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर चर्चेनंतर गावातील जंगलात पिंजरा लावण्याचे ठरले. अखेर वनविभागाचे अधिकारी सायंकाळी पिंजऱ्यासह गावात परतले आणि पिंजरा गावातील जंगलात लावण्यात आला. दरम्यान, स्थानिक देविदास गोवेकर यांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल वन अधिकाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानले आहेत. या अगोदर मुळगाव आणि धबधबा गावातही बिबट्याचे दर्शन घडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT