Kala Academy  Dainik Gomantak
Video

Kala Academy: 'कला अकादमीक हाडात मूळ स्थितीत' - कला राखण मांड, Video

Kala Rakhon Mand: कला अकादमीच्या विषयावर ‘कला राखण मांड''च्या सदस्यांनी सोमवारी सकाळी मंत्रालयात कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांच्याशी चर्चा केली.

Sameer Panditrao

पणजी: कला अकादमीच्या विषयावर ‘कला राखण मांड''च्या सदस्यांनी सोमवारी सकाळी मंत्रालयात कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर याविषयी बैठक घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती देविदास आमोणकर यांनी दिली. आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तवडकर यांची भेट घेतली. यात विशाल पै काकोडे, दिलीप प्रभुदेसाई, साईश पाणंदीकर यांची उपस्थिती होती.

आमोणकर म्हणाले, यापूर्वीचे कला व संस्कृती मंत्री होते, त्याच्याबरोबर आमची कधीच बैठक झाली नाही. आमचे काही म्हणणे आहे, ते ऐकून घेत नव्हते. त्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला, तो तवडकरांच्या कारकिर्दीत होऊ नये, यासाठी आम्ही तवडकर यांची भेट घेतली आणि आमची बाजू स्पष्ट केली. कला अकादमी पूर्वी होत्या त्या स्थितीत दुरुस्त करून मिळावी म्हणून आम्ही आंदोलन उभारले, त्याविषयी माहिती त्यांना दिली. आम्ही जे आंदोलन झाले, त्याविषयी तवडकरांना माहिती नव्हती त्यामुळे आम्हाला ती द्यावी लागली. रवींद्र भवनांचे सध्या जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते सोडविण्याची मागणी केली. तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या रवींद्र भवनात अशी समस्या निर्माण होऊ नयेत, असेही त्यांना सूचित केले.

ते म्हणाले, तवडकर यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून, हे विषय सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ. त्याशिवाय कलाकारांचीही बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले. तवडकर यांच्यामध्ये संवेदनशीलता आहे, त्यांनी सर्व विषय समजून घेतले असून, ते नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT