Juvem Nadora Dainik Gomantak
Video

Juvem Nadora Bridge: जुवे-नादोड्यातील फुटब्रीज धोकादायक स्थितीत; तातडीने दुरुस्‍तीची स्थानिकांची मागणी

Juvem Nadora Bridge: नादोडा ते राण्याचे जुवे बेटाला जोडणारा या लोखंडी पुलाच्या चॅनलचे जोड गंजल्यामुळे तुटले गेले आहेत.

Sameer Panditrao

Juvem Nadora old iron bridge

म्हापसा: राण्याचे जुवे-नादोडा येथील ३८ वर्षे जुना लोखंडी पदपूल कमकुवत झाला आहे. या पुलाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नादोडा ते राण्याचे जुवे बेटाला जोडणारा या लोखंडी पुलाच्या चॅनलचे जोड गंजल्यामुळे तुटले गेले आहेत. या बेटाला जोडणारा हा शापोरा नदीवरील एकमेव पूल ३८ वर्षांपूर्वी बांधला होता. मात्र सध्या त्‍याची स्‍थिती खूपच दयनीय बनली आहे. स्‍थानिक आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पंचायत मंडळ व सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांसह या पुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पुलाचे दुरूस्ती काम तात्काळ हाती घेण्याची सूचना त्यांनी साबांखाच्या अधिकाऱ्यांना केली.

राण्याचे जुवे येथील खचलेल्या पुलाची आम्ही स्‍थानिकांसोबत पाहणी केली. हा पूल मोडल्यास वाड्यावरील लोकांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे पुलाची दुरुस्‍ती तात्काळ हाती घेण्याची विनंती केली आहे, जेणेकरून लोकांची गैरसोय होऊ नये. लवकरच कामाला प्रारंभ होईल.
नीळकंठ हळर्णकर, आमदार
हा पूल राण्याचे जुवे बेटावरील दळणवळणाचे एकमेव साधन आहे. या वाड्यावरील एकूण ३५ कुटुंबे या पुलावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्‍यांची गैरसोय होता कामा नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी लक्ष घालून या पुलाची तातडीने दुरुस्‍ती करावी.
विश्‍‍वजा हळदणकर, पंचसदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT