Impact on Coconut Crop At Goa Dainik Gomantak
Video

Goa News: नारळामुळे वाढली चिंता! उत्पादनात मोठी घट; चढ्या दरामुळे नागरिक त्रस्त

Coconut Crop Impact At Goa: असंतुलित हवामानामुळे स्थानिक बागायतीतील नारळांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून रोग आदी प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम होतो. यावर्षी मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Climate Change Threatens Goas Coconut Farming

डिचोली: असंतुलित हवामानामुळे स्थानिक बागायतीतील नारळांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून रोग आदी प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनावर परिणाम होतो. यावर्षी मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा नारळ उत्पादनात जवळपास ४० टक्के घट झाली आहे, अशी माहिती बागायतदारांनी दिली.

दैनंदिन आहारातील मुख्य घटक आणि धार्मिक कार्यात महत्त्व असलेला नारळ आता पुन्हा महाग झाल्याने सामान्य ग्राहकांच्या कपाळाला आट्या पडू लागल्या आहेत. चतुर्थीवेळी काहीसा स्वस्त झालेला नारळ आता पुन्हा महागला आहे. नारळाच्या दरात प्रतिनगामागे दहा ते बारा रुपये अशी वाढ झाली आहे. डिचोलीच्या बाजारात नारळांचे दर सध्या प्रतिनग ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

चतुर्थीपूर्वी नारळ महाग झाले होते. मात्र, चतुर्थीवेळी नारळाच्या दरात काहीशी घसरण झाली होती. आता पुन्हा नारळांचे दर वाढल्याने आधीच महागाईमुळे त्रस्त झालेली सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नारळ बागायतदारांपुढेही अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसेच हल्ली उत्पादनातही घट झाली आहे.

‘शेकरे’ प्राण्याचा उपद्रव

तापमानात झालेली वाढ, त्यातच पावसाच्या माऱ्यामुळे नारळाच्या पिकावर परिणाम झाला आहे. त्यातच ‘शेकरे’ जातीच्या प्राण्याचा उपद्रवही वाढलेला आहे. ‘शेकरे’ जातीचा हा प्राणी माडावरील नारळ खाऊन टाकतात, अशी माहिती काही बागायतदारांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT