Calangute Illegal Structures Dainik Gomantak
Video

Calangute News: कळंगुट येथे 'सीआरझेड क्षेत्रात' उभारलेल्या बांधकामावर हातोडा

Calangute Illegal Construction: उमतावाडा-कळंगुट येथे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बेकायदा उभारण्यात आलेल्या हॉटेल जर्मनीचा दर्शनी भाग संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Hotel Demolition

कळंगुट: उमतावाडा-कळंगुट येथे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बेकायदा उभारण्यात आलेल्या हॉटेल जर्मनीचा दर्शनी भाग शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिल्लीस्थित कुलविंदर सिंग तसेच भूपिंदर सिंग यांच्या मालकीचे असलेल्या या हॉटेलचा दर्शनी भाग सागरी नियंत्रण रेषेत (सिआरझेड) येत असल्याने संबंधित मालकांना प्राधिकरणाकडून या आधी रीतसर नोटीस पाठविण्यात आली होती व बेकायदा भाग तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, या गोष्टींकडे हॉटेल मालकांनी काणाडोळा केल्याने सरतेशेवटी सिआरझेड प्राधिकरण तसेच स्थानिक पंचायतीच्या मदतीने हॉटेल जर्मनीचा दर्शनी भाग बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात आला.

दरम्यान, अन्य एका प्रकरणात खोब्रावाडा-कळंगुट येथील इनासियो फर्नांडिस यांच्या मालकीच्या बेकायदा बांधकामावर सिआरझेड प्राधिकरणाकडून कारवाई करत ते पाडण्यात आल्याची माहिती कळंगुट पंचायत सूत्रांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT