Sanquelim Hit And Run Dainik Gomantak
Video

Sanquelim Hit And Run: दारूच्या नशेत अल्पवयीन मुलानं दुचाकीस्वाराला दिली धडक, पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात

Goa Hit And Run Case: गोकुळवाडी, साखळी येथे घडलेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात डिचोली पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

Sameer Amunekar

साखळी: गोकुळवाडी, साखळी येथे घडलेल्या 'हिट अँड रन' प्रकरणात डिचोली पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हा मुलगा दारूच्या नशेत कार चालवत असताना त्याने एका मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात कुडणे येथील प्रणेश मळीक गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना घडली तेव्हा आरोपी मुलगा व त्याचे दोन मित्र कारमधून जात होते. अपघातानंतर तिघेही घटनास्थळावरून फरार झाले. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी कार मालक आणि दोन्ही प्रवाशांना शोधून काढून अटक केली. तिघांनाही प्राथमिक चौकशीनंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. दरम्यान, अल्पवयीन अपना घर येथे नेण्यात आले असून, त्याला प्रधान दंडाधिकारी बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Janmashtami 2025: फक्त 43 मिनिटांचा शुभकाळ, मग कधी आणि कशी कराल गोकुळाष्टमीची पूजा?

Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

Modi Express: "गणपतीक गावाक जावचा हा ना!" नितेश राणेंची कोकणवासियांना भेट; मोदी एक्सस्प्रेसची घोषणा

IGNOU New Course: आता घरबसल्या मिळवा ‘भगवद्गीते’वर मास्टर डिग्री! इग्नूने सुरु केला नवा अभ्यासक्रम; आपत्ती व्यवस्थापन अन् कृषी खर्चावरही डिप्लोमा

SCROLL FOR NEXT