Sadetod Nayak Dainik Gomantak
Video

Sadetod Nayak: डिचोली बसस्थानक डिसेंबरपूर्वी पूर्ण होणार - आमदार चंद्रकांत शेट्ये

Bicholim: डिचोली बसस्थानक कामाला सुरुवात झाली आहे. डिचोली बसस्थानक आता ट्रॅकवर आले असून, डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल. दर १५ दिवसांनी मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतो.

Sameer Amunekar

पणजी: डिचोली बसस्थानक कामाला सुरुवात झाली आहे. डिचोली बसस्थानक आता ट्रॅकवर आले असून, डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल. दर १५ दिवसांनी मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतो. त्यामुळे एकंदरीत कामाचे वेग पाहता नगरपालिका निवडणूकपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे, असे डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्ट केले.

सर्व मंत्र्यांशी माझे चांगले संबंध असल्याने माझ्या कामात कधीच कुठलाही अडथळा आलेला नाही. आता मी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे की नाही, हे मी सांगण्यापेक्षा लोकांनीच ठरवावे, असे स्पष्ट मत शेट्ये यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक’चे संपादक -संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात डॉ. शेट्ये बोलत होते. या संवादात त्यांनी राजकीय भूमिका, अपक्ष आमदार राहण्याचे कारण, डिचोलीतील प्रलंबित विकासकामे, बेरोजगारी, खाण प्रश्न आदी मुद्द्यांवर मनमोकळेपणाने आपली भूमिका मांडली.

अपक्ष राहण्यामागील कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, २०२० मध्ये माझा लहान भाऊ जिल्हा पंचायत सदस्य होता. त्यावेळी मी राजकारणात उतरायचा निर्णय विचारपूर्वक घेतला.

सर्व पक्षांनी मला उमेदवारीसाठी विचारले, पण मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. तथापि, निवडून आल्यानंतर मी पहिल्यांदाच भाजपला सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले होते. माझे विचार भाजपशी जुळणारे आहेत. बी.एल.संतोष यांना भेटूनही मी हे सांगितले आहे. मी भाजपचा आहे, असेही मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, असे शेट्ये म्हणाले.

राजकारण, समाजकारणाचा समतोल

मी एक डॉक्टर आहे आणि समाजकार्य हे त्या माध्यमातून सुरूच असते. त्यामुळे राजकारणात येण्याचा सल्ला मला कोणी दिला नव्हता. स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१२ मध्ये मला राजकारणात यावे, असे म्हटले होते. पण त्यावेळी मी नुकतेच हॉस्पिटल सुरू केले होते. आज माझे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ऑटोमॅटिक चालते आणि मी लोकांच्या समस्या घेऊन मनापासून काम करतो. आणि अशाप्रकारे मी हॉस्पिटल आणि राजकारण यामध्ये संतुलन साधतो, असे त्यांनी नमूद केले.

समस्या व उपाययोजना

बेरोजगारी हा डिचोलीतील मोठा प्रश्न आहे. रोजगारीच्या संधी निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न देखील सुरू आहेत. पाण्याची समस्या देखील मतदारसंघात होती आणि पाण्याच्या समस्येवर तीन वर्षे काम करून ती पाइपलाइन बदलण्यात आली आहे. आज नवीन जलप्रकल्प उभारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

कुटुंबातील ऐक्य व समाजभान

आम्ही सहा भाऊ असून, आमच्यात कधीच भांडण झाले नाही. निर्णय आमच्या घरात एकच घेतो आणि तो अंतिम असतो. मी राजकारणात असलो तरी समाजकारणातही सक्रिय आहे, असे सांगत शेट्ये यांनी आपला सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन स्पष्ट केला.

राजकीय इच्छाशक्ती हवी

मी निवडून आल्यापासून एकही काम थांबलेले नाही. ७० वर्षांपासून जे रस्ते प्रलंबित होते, ते मी पूर्ण केले. ‘काम होत नाही’ याचा दोष इतरांवर ठेवू नये. माझ्या प्रयत्नांमुळे अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लागले आहेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. विधानसभेत मी बोलण्याची संधी सोडत नाही. प्रत्येक दिवशी तीन प्रश्न सादर करतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

खाण व स्थानिक रोजगार : माझ्या मतदारसंघात खाणपट्टा आहे, त्यामुळे ट्रक चालक व इतर कामगार आमच्याच मतदारसंघातील असावेत, यासाठी मी प्रयत्नरत आहे. स्थानिक कंत्राटदारांना संधी मिळावी यासाठी कंपनीशी बोलणी सुरू आहेत, असे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. दरम्यान लीज जागांवरील मंदिरे, स्थानिकांचे हक्क आणि रोजगार यावरही ठोस चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Viral Video: हे काय चाललंय! महिलेचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हीही माराल डोक्यावर हात; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: "घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण"

SCROLL FOR NEXT