Harvalem child accident Dainik Gomantak
Video

Goa Swing Accident: झोपाळ्यावरील खेळ जीवावर बेतला; हरवळ्यात गळफास लागून अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

toddler dies on swing: घराबाहेर बांधलेल्या झोपाळ्यावर खेळताना गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार, ३ मे रोजी संध्याकाळी घडली

Akshata Chhatre

साखळी: वरचे हरवळे-साखळी येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका कुटुंबातील अडीच वर्षांच्या मुलीचा घराबाहेर बांधलेल्या झोपाळ्यावर खेळताना गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार, ३ मे रोजी संध्याकाळी घडली.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव आराध्या ज्ञानेश्वर इंगळे असे असून हे कुटुंबीय मूळचे कर्नाटक येथील आहे. सध्या ते वरचे हरवळे-साखळी येथे भाड्याच्या घरात राहतात.

घराबाहेर बांधलेल्या कपड्याच्या झुल्यावर आराध्या ही तिचा मोठा भाऊ आणि इतर लहान मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी तिच्या मानेला या झोपाळ्याच्या दोरीचा फास बसला. त्यात ती बेशुद्ध पडल्याने तिला लागलीच साखळी सरकारी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांनी पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT