Video Dainik Gomantak
Video

Goa Postal Scam विजय सरदेसाईंनी शेअर केलं Sting Operation; महाराष्ट्रातील 50 पोस्टमन्सची नेमणूक

Goa Postal Scam Sting Operation: पोस्ट विभागात गोवा महाराष्ट्राअंतर्गत येते. गोव्यासाठी ५० पोस्टमन्सची नेमणूक करण्यात आली होती.

Pramod Yadav

पणजी: महाराष्ट्रात ३.५० लाख रुपये देऊन पोस्टमन तयार होतात, अशा पोस्टमन्सची गोव्यात बदली झाल्यानंतर त्यांना गोव्याची माहिती नसते त्यामुळे लोकांना त्यांची पत्रे मिळत नाहीत, असे विजय सरदेसाई यांनी मंगळवारी सभागृहात सांगितले.

पोस्ट विभागात गोवा महाराष्ट्राअंतर्गत येते. गोव्यासाठी ५० पोस्टमन्सची नेमणूक करण्यात आली होती. त्यातील ४० पोस्टमन गोव्यातील होते. परंतु, त्यांच्याजागी आता महाराष्ट्रातील पोस्टमन्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या पोस्टमन्सना गोव्याची माहिती नसते. स्थानिकांचे पत्ते त्यांना माहीत नसतात. त्यामुळे अनेक गोमंतकीयांना त्यांची पत्रेच मिळत नाहीत, असे सरदेसाई म्हणाले.

कोकणी समजणारे हवे !

कोकणी भाषा समजणाऱ्यांचीच गोव्यात पोस्टमन म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना दिली. परंतु, ज्यांच्यावर गदा आली त्या ४० पोस्टमन्सचे काय करणार, या सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ‘विवेकानंद भवन’चे 11सप्टेंबर रोजी लोकार्पण

Goa Politics: खरी कुजबुज; पाचव्या मृत्यूने गूढ वाढले

Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

Goa London Flight: लंडन-गोवा विमानसेवा रद्द! Air Indiaचा निर्णय; अहमदाबाद, अमृतसर सेवा होणार सुरु

SCROLL FOR NEXT