CM Pramod Sawant on Engineers Dainik Gomantak
Video

अभियंत्यांची वाटचाल 'स्विच ऑफ'! केवळ पगारासाठी सरकारी नोकरीत, मुख्यमंत्र्यांकडून खेद व्यक्त

CM Pramod Sawant on Engineers: राज्यातील अनेक अभियंत्यांनी सरकारी नोकरी स्वीकारल्यानंतर आपली पुढील वाटचाल जवळजवळ ‘स्विच ऑफ’ केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी: राज्यातील अनेक अभियंत्यांनी सरकारी नोकरी स्वीकारल्यानंतर आपली पुढील वाटचाल जवळजवळ ‘स्विच ऑफ’ केली आहे. केवळ पगार मिळवण्याची अपेक्षा ठेवून हे अभियंते काम करतात. अनेकवेळा त्यांना त्यांचे कामही सांगावे लागते.

आपल्या अभियांत्रिकी पेशाचा समाजाला किंवा नवीन पिढीला लाभ करून देण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही योगदान दिले जात नाही, ही खेदाची बाब आहे, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

साखळी येथे नव्याने स्थापन झालेल्या साखळी इंजिनियर्स असोसिएशनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे संचालक कबीर शिरगावकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता संदीप के. पी. चोडणेकर, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस, साधनसुविधा विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सुधीर परब, गोवा उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष नारायणराव देसाई, टेक्नॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष मंगिरीश सालेलकर, लघु उद्योग भारतीचे कार्यकारी समिती सदस्य सुशांत रावळ, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता सूरज राणे, इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट गोवा केंद्राच्या अध्यक्षा जेनिफर लुईस ई. कामत, अभिनव आपटे, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर, प्राध्यापिका रश्वीता गडेकर, इडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र एस. पै आंगले, सेंटर फॉर इनक्युबेशन अँड बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन करमली, भारतीय व्यवसायिकता विकास संस्थेचे केंद्रप्रमुख सिवन अंबट्टू, स्टार्टअप आणि आयटी प्रोत्साहन कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत आदी उपस्थित होते.

उपस्थित विविध खासगी, सरकारी व उद्योजक अभियंत्यांनी आपापले अनुभव कथन केले. तसेच अभियंता अंकुर काणकोणकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

४५० अभियंत्यांची पदे रिक्त

राज्यात आज अभियंता पदाची साडेचारशे पदे रिक्त असणे ही गोव्यासाठी नुकसानकारक बाब आहे. यावरूनच अभियांत्रिकी शिक्षणाची गोव्यात किती प्रमाणात गरज आहे, हे दिसून येते. केवळ पारंपरिक बीए, बीकॉम, बीएससीचे शिक्षण न घेता सध्या वाव असलेल्या शिक्षणावर भर दिल्यास येणाऱ्या काळात गोव्यात आवश्यक क्षेत्रांमध्ये अभियंत्यांची उणीव भासणार नाही. गोव्यात अभियंत्यांना विविध क्षेत्रांत मोठा वाव आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

साखळी इंजिनियर्स असोसिएशनची समिती

समन्वयक : राहुल परब, सुरज नाईक, राधाप्रसाद बोरकर, सिद्धेश साळुंखे, अमोल बेतकीकर.

गाभा समिती व कार्यकारी समिती : दिनेश गावस, अजिंक्य परब, ओमकार साखळकर, संदीप पार्सेकर, विजेंद्र देसाई, वामन साखळकर, प्रतीक नागवेकर, सिद्धार्थ मळीक, शाणू उसगावकर, अंबरीश महालेस, विजय पवार, यश अवखळे, शिवम गावकर, राजदत्त मापारी, अक्षय नाईक, विशांत एकावडे, प्रसाद पांगम, सुशांत पोकळे, यतीन काणेकर, पियुष रामनाथकर, नितेश सामंत.

आऊटरिच समिती : निखिल कुंभार, स्नुषा शिरोडकर, अंगद कामत, साईप्रसाद परब, दर्शन परब, प्रज्वल गावस, लक्ष्मण गावस, वीरेंद्र एकावडे, दिपेश सडेकर, राजू पिरांका, आदित्य गावस, शशांक भगत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT