Dean Bandekar decision Dainik Gomantak
Video

GMC Controversy: व्हिडिओग्राफी करणाऱ्यांवर FIR; गोमेकॉतील घटनेनंतर डीन बांदेकर यांचा मोठा निर्णय

Dr Rudresh Kuttikar news: सर्व डॉक्टरांच्या वतीने डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना निवेदन सादर केले

Akshata Chhatre

GMC doctor suspension: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या आंदोलनात तीन मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत आणि सर्व डॉक्टरांच्या वतीने डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना निवेदन सादर केले. या मागण्या सादर केल्यानंतर कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी माध्यमांशी संवाद साधून संदर्भातील माहिती सादर केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. रुद्रेश यांच्या निलंबनाचे आदेश अद्याप जारी केलेले नाहीत, तसेच आरोग्यमंत्री मंत्री विश्वजित राणे यांच्या जाहीर माफीबद्दल मंत्रालयाच्या कार्यालयात संदेश पाठवण्यात आला असून प्रतिसादाची वाट पहिली जातेय.

आंदोलकांची मागणी पूर्ण करत यापुढे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात व्हिडिओग्राफी करण्यास आता बंदी घालण्यात आली असून पोलिस देखील तैनात केले जातील आणि कडक एसओपी तयार करण्यासाठी ४ विभागीय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे निलंबनाच्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT