Goa Road Construction  Dainik Gomantak
Video

Goa Road Closed: रेल्वे ओव्हरब्रीज बांधकामामुळे गवंडाळी रस्ता वाहतुकीसाठी वर्षभर बंद!!

Road Closure Goa: बहुप्रतीक्षित रोड ओव्हरब्रिजचे बांधकाम सुरू असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आलाय

Akshata Chhatre

गवंडाळी: गोव्यात सध्या रस्ते वाहतुकीत मोठे बदल होत आहेत. जुन्या मांडवी आणि जुवे पुलापाठोपाठ आता धावजे रेल्वे रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. धावजे येथे बहुप्रतीक्षित रोड ओव्हरब्रिजचे बांधकाम सुरू असल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आलाय. धावजे रेल्वे क्रोसिंगवरील ओव्हरब्रीजच्या बांधकामासाठी मासेमारी प्रशिक्षण केंद्र ते धेंपो फुटबॉल ग्राउंडपर्यंत गवंडाळी रस्ता २५ फेब्रुवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या मार्गाचा दैनंदिन वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडून जनहितासाठी माहिती जारी करण्यात आली आहे. खास करून साखळी, डिचोली आणि वाळपई इथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बातमीची नोंद घेणं महत्वाचं असणार आहे. हा रास्ता बंद असल्या कारणाने वाहतूक भाणस्तारी रस्त्यावरून किंवा खोर्ली आयडीसी रस्त्यावर वळवली जाईल, मात्र या पर्यायी रस्त्यांवरून केवळ हलक्या वाहनांनाच ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची नोंद घेणं महत्वाचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT