Ganjem-Usgao Road Repair Dainik Gomantak
Video

Ganjem-Usgao Road Repair: गांजे-उसगाव रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात

Ganjem-Usgao Road Repair Work Commences: गांजे-उसगाव येथील सरकारी हायस्कुलजवळील मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर वीज खात्याकडून सुरुवात करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

गांजे-उसगाव येथील सरकारी हायस्कुलजवळील मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर वीज खात्याकडून सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

फोंडा ते वाळपई मार्गावर असलेल्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अपघातांची शक्यता वाढल्याने ग्रामस्थांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. तसे न झाल्यास फोंडा-वाळपई मार्गावरील वाहतूक रोखून धरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

ग्रामस्थांच्या या संतप्त भूमिकेनंतर अखेर वीज खात्याने तातडीने कामाला हात घालून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अजूनही ग्रामस्थांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session Live: 'मोपा'तून आतापर्यंत मिळाला ६५ कोटींपेक्षा अधिक महसूल!

Goa: पणजी, साखळीला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला; आता उरलेल्या गोव्याचे काय?

Goa Assembly Session: लोकशाहीची हत्या तुम्ही केली! सभागृहात विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यात शाब्दिक टोलेबाजी

Junk Food: सरकारी अहवाल सांगतो, आपला देश 2050 पर्यंत सर्वाधिक लठ्ठंभारती लोकांचा ‘पर्मनंट ॲड्रेस’ होणार आहे

Ro-Ro Ferry in Goa: "रो-रो फेरी बंद करू, लेखी स्वरूपात सांगा" व्हायरल व्हिडिओवर मंत्री फळदेसाई संतापले

SCROLL FOR NEXT