Dudhdhsagar Tourism Season Dainik Gomantak
Video

Dudhdhsagar Tourism: 'दुधसागर'चा मुद्दा राहिला बाजूलाच! सावर्डे - भाजपामध्ये खडाजंगी

Dudhdhsagar Tourism Controversy: दूधसागर टूर ऑपरेटरसंबंधीच्या वादात नाहक स्थानिक आमदार तथा ‘जीटीडीसी’चे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यावर शरसंधान करणे चुकीचे असून सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार खंडन सावर्डे मतदारसंघातील पंचायत प्रतिनिधी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: दूधसागर टूर ऑपरेटरसंबंधीच्या वादात नाहक स्थानिक आमदार तथा ‘जीटीडीसी’चे अध्यक्ष गणेश गावकर यांच्यावर शरसंधान करणे चुकीचे असून सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार खंडन सावर्डे मतदारसंघातील पंचायत प्रतिनिधी तसेच भाजप कार्यकर्त्यांनी केले. पक्षश्रेष्ठींनीच विलास देसाई यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

आज (मंगळवारी) फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दत्तप्रसाद सावर्डेकर, शिरिष देसाई, गोविंद शिगावकर, रुपेश देसाई, शशिकांत नाईक, मोहन गावकर तसेच इतर पंचायत प्रतिनिधी हजर होते.

दूधसागर पर्यटनावर ‘जीटीडीसी’ची वक्रदृष्टी!

दूधसागर येथील जीप असोसिएशनचा संघर्ष सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ३० वर्षांपूर्वीपासून सुरळीत सुरु असलेल्या पर्यटन व्यवसायावर आता जीटीडीसीची वक्रदृष्टी पडल्याने व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे,असा आरोप गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT