curchorem fire Dainik Gomantak
Video

कुडचडे मार्केटमध्ये भीषण आग! भाजीपाला आणि फुलांचे स्टॉल जळून खाक, विक्रेत्यांचे मोठे नुकसान

curchorem market fire: कुडचडे येथील GSUDA मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली

Akshata Chhatre

कुडचडे: दीपावलीच्या उत्साहाला सुरुवात होत असतानाच, कुडचडे येथील GSUDA मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघाती आगीत बाजारात असलेले फुले, फळे आणि भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांचे संपूर्ण स्टॉल आणि शेड जळून खाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे भाजीपाला विभागात असलेली चार दुकाने देखील पूर्णपणे भस्मसात झाली. या घटनेमुळे दिवाळीच्या तोंडावर विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, कारण उत्सवासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला होता.

आगीची माहिती मिळताच कुडचडे अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी त्वरित आणि प्रभावीपणे केलेल्या प्रयत्नांमुळे ही आग वेळेत नियंत्रणात आणण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळे बाजारातील इतर भागांमध्ये आग पसरण्याचा मोठा धोका टळला.

ही आग कशामुळे लागली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पहाटेच्या वेळेत लागलेली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन नुकसानीचा पंचनामा करत असून, घटनेच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT