Curchorem Accident Dainik Gomantak
Video

Curchorem Accident: कुडचडेत कार आणि डंपरचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

Curchorem Accident News: कुडचडे येथील शेलवण भागात कार आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Manish Jadhav

कुडचडे येथील शेलवण भागात कार आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेलवण येथील मुख्य रस्त्यावर कार आणि डंपरची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि गंभीर जखमी चालकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT