Amthane Dam Water Level Dainik Gomantak
Video

Amthane Dam: ‘आमठाणे’ धरणाबाबत चिंता नको, जलसाठा नियंत्रित होणार; CM सावंत

Amthane Dam Water Level: मुख्यमंत्री सावंत मेणकूरे येथे आले होते. त्यावेळी आमठाणेहून मेणकूरेला जाताना मुख्यमंत्र्यांनी आमठाणे धरणाची पाहणी करून, कंत्राटदाराकडून सध्याच्या कामाचा आढावा घेतला.

Sameer Panditrao

डिचोली: आमठाणे धरणावरील ‘गेट’चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून चालू जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ‘आमठाणे’तील जलसाठा पूर्वपदावर आणण्यासाठी जलसंपदा खात्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तशी शक्यता व्यक्त करताना ‘आमठाणे’बाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे म्हटले. कामानिमित्त आमठाणे धरणावर यंदा वर्षा पर्यटनाचे चित्र आढळून येत नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारी मेणकूरे येथे आले होते. त्यावेळी आमठाणेहून मेणकूरेला जाताना मुख्यमंत्र्यांनी आमठाणे धरणाची धावती पाहणी करून, कंत्राटदाराकडून सध्याच्या कामाचा आढावा घेतला. जनतेने आमठाणेबाबत चिंता करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मेणकूरे येथील कार्यक्रमात बोलताना सांगून, पुढील आठ-दहा दिवसात गेटीचे काम पूर्ण होणार असून, नंतर धरणात पाणी साठवण्यात येणार आहे. सतत पाऊस पडल्यास हे धरण लवकर भरणार.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धरणावरील दुरुस्तीचे काम चालू जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे, असे जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT