Laxmikant Parsekar | Goa News  Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर रोखठोक बोलले

Ex-CM Laxmikant Parsekar on Cash For Job Scam: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर या प्रकरणी रोखठोक बोलले. पार्सेकरांनी आपल्या वक्तव्यातून सरकारलाही घरचा आहेर दिला.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वादंग माजला आहे. सातत्याने नव-नवे खुलासे होत आहेत. यातच आता, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर या प्रकरणी रोखठोक बोलले. पार्सेकरांनी आपल्या वक्तव्यातून सरकारलाही घरचा आहेर दिला.

पार्सेकर म्हणाले की, ''पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही प्रमाणपत्र देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."

दरम्यान, पार्सेकरांच्या वक्तव्यानंतर भाजपातील काही घटकांनी मात्र भुवया उंचावल्या आहेत. असे प्रकार पार्सेकरांच्या कार्यकाळातही घडले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पार्सेकर मुख्यमंत्रिपदी असताना त्यांच्या अखेरच्या दिवसांत नोकरभरती थांबवण्यात आली होती. 'त्या' प्रक्रियेत अनेक आतबट्याचे व्यवहार झाले होते. त्यानंतर बरीच वर्षे उलटली; पण नोकऱ्याही नाहीत आणि पैसेही नाहीत, अशी काहींची गत झाली असल्याचे भाजपच्याच काही लोकांकडून बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT