bjp  Dainik Gomantak
Video

BJP Goa Yuva Morcha: राहुल गांधींच्या हिंदुविरोधी वक्तव्याचा गोवा भाजपकडून निषेध

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या हिंदू समाजावरील वक्तव्याचे गोव्यातही पडसाद उमटले. भाजपच्या वतीने रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

Manish Jadhav

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले. राहुल यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान भगवाना शिवाचा, गौतम बुद्धांचा, गुरुनानक देव आणि भगवान महाविरांचा फोटो दाखून त्यांनी दिलेल्या संदेशाबद्दल सांगितले. एवढेच नाहीतर हिंदू कधीही हिंसा भडकवू शकत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हिंसाचार भडकवत आहेत.

राहुल गांधींच्या हिंदू समाजावरील वक्तव्याचे गोव्यातही पडसाद उमटले. भाजपच्या वतीने रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. गोवा भाजपच्या वतीने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

वॉस्कोचे आमदार कृष्णा साळकर म्हणाले की, 'राहुल गांधी यांच्या हिंदूविरोधी वक्तव्यचा मी निषेध करतो. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असो की मग गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असो त्यांनी कधीच दुसऱ्या धर्माला ठेच पोहोचेल असे वक्तव्य कधीच केले नाही. मात्र राहुल गांधी यांनी हिंदूविरोधी वक्तव्य करुन अवघ्या हिंदू समाजाचा अपमान केलाय.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT