Bison Attack Dainik Gomantak
Video

Bison Attack Goa: मळ्यात गेले आणि गवा रेड्याने हल्ला केला; दोघेजण गंभीर जखमी

Wild Animal Attack Goa: अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला असता ते जखमी अवस्थेत खाली पडले. त्यांच्या तोंडाला व डोक्याला मार लागला.

Pramod Yadav

सावईवेरे: बोणये-सावईवेरे भागातील धर्मा गिरोडकर हे येथील डोंगरावरील आपल्या मळ्यात गेले असता त्यांच्यावर गव्या रेड्याने हल्ला केला. यात गव्या रेड्याचे शिंग त्यांच्या चेहऱ्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता.१५) सायं. ४ वा. च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, धर्मा गिरोडकर हे सोमवारी सायंकाळी आपल्या मळ्यावर गेले होते. यावेळी खूप पाऊस पडत होता. त्यांनी रेनकोट परिधान केला होता. त्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या गव्याची कल्पना आली नाही.

अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला असता ते जखमी अवस्थेत खाली पडले. त्यांच्या तोंडाला व डोक्याला मार लागला. अशा अवस्थेतच त्यांनी लोकांना हाका मारण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन त्यांना उचलले. नंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT