Benaulim water stream revival Dainik Gomantak
Video

Benaulim: बाणावलीतील नष्ट झालेला नैसर्गिक झरा वाहू लागला! वॉरन आलेमाव यांच्या पुढाकारामुळे काम पूर्ण; गावकऱ्यांत आनंद

Benaulim Water Stream : बाणावली हा सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यालगतचा एक प्रमुख गाव आहे. हा गाव नैसर्गिकरीत्या परिपूर्ण असून या गावात अनेक झरे वाहताना दिसत आहेत.

Sameer Panditrao

Benaulim Village Water Stream

सासष्टी: बाणावली हा सासष्टीतील समुद्रकिनाऱ्यालगतचा एक प्रमुख गाव आहे. हा गाव नैसर्गिकरीत्या परिपूर्ण असून या गावात अनेक झरे वाहताना दिसत आहेत. काही झरे बांधकामांमुळे बुजलेले आहेत तर काही विकासकामाच्या नावांखाली नष्ट केलेले आहेत. असाच एक बुजलेल्या अवस्थेत असलेला झरा पुनर्जीवित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.

हा झरा पुनर्जीवित करण्यासाठी समाजकार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी बरेच कष्ट घेतलेले आहेत. आपण स्वखर्चाने हा झरा सुरू केला आहे, त्यासाठी आपल्याला एक लाख रुपये तरी खर्च येणार आहे. जर जलस्रोत खात्यातर्फे हे काम केले असते तर त्यांनी ५ लाख रुपये खर्च दाखविला असता, असेही वॉरन आलेमाव यांनी सांगितले.

रॉक फर्नांडिस म्हणाले की, आपण पंचायतीला झऱ्याचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक पत्रे दिली होती; पण पंचायतीने ते गांभीर्याने घेतले नाही. आपण सामाजिक कार्यकर्ते वॉरेन आलेमाव यांना पुढाकार घेऊन खोदकाम सुरू करण्याची विनंती केली होती. हा झरा ४० ते ५० वर्षांपूर्वी वाहत होता. नंतर तो बुझून गेला होता.दरम्यान, पंचसदस्य एझलिना फर्नांडिस यांनी सांगितले की, गावातील झरे पुनर्जीवित करण्यासाठी पंचायतीने ठराव घेतलेला आहे. हा झराही योग्य पद्धतीने बांधून काढला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT