Babu Kavlekar Kala Academy, Kala Academy Chairman Dainik Gomantak
Video

Kala Academy: 'कला अकादमीत बरेच काही करण्यासारखे आहे'; कवळेकरांनी स्वीकारला पदभार Video

Babu Kavlekar Kala Academy: अकादमीवर झालेल्या आरोपांविषयीच्या बाबी आणि उर्वरित कामांविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल, असे मत चंद्रकात कवळेकर यांनी व्यक्त केले.

Sameer Panditrao

राज्यातील नाट्य कलाकार, त्रियात्रिस्ट आणि कलेशी संबंधित सर्व घटकांना बरोबर घेऊनच कला अकादमीचे काम पुढे नेले जाईल. तसेच अकादमीवर झालेल्या आरोपांविषयीच्या बाबी आणि उर्वरित कामांविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल, असे मत चंद्रकात (बाबू) कवळेकर यांनी व्यक्त केले.

कला अकादमीचे नवनियुक्त चेअरमन म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी सांगितले की, आपण यापूर्वी मंत्री, आमदार असताना जी जबाबदारी मिळाली, ती आपण योग्यरित्या पार पाडली. कला अकादमीचे चेअरमनपद यापलिकडचे आहे, असे वाटते. आपण प्रत्येक घटकाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही. बांधकामास सुरूवात न झालेल्या खुल्या रंगमंचाच्या कामाला विलंब झाल्याचे लक्षात आणून देताच त्यांनी त्याविषयी अभ्यास आवश्यक आहे. कोणत्याही विषयावर आत्ता बोलणे योग्य नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आव्हान पेलणार!

कला अकादमीत बरेच काही करण्यासारखे आहे. कलाकारांना अडचणी येऊ नयेत, याकडे आपण लक्ष घालू , असे सांगत कवळेकर म्हणाले, आपल्याला चेअरमन म्हणून काम करण्यासाठी मिळालेला वेळ कमी आहे आणि आव्हान मोठे आहे, ते आव्हान पेलण्याचे काम आपण करू. त्याचबरोबर अकादमीची समिती अजूनही नेमली नसल्याच्या प्रश्नावरही त्यांनी माहिती घेतल्यावरच बोलणे उचित ठरेल असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT