अष्टमीच्या फेरीला यंदा २६ तारखेपासून सुरवात होत आहे. मांडवी किनारी भरणाऱ्या या फेरीसाठी महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारी अर्जांची विक्री करण्यात आली. त्यात यंदा गोमंतकीय व्यावसायिकांना त्यातून न वगळता सरसकट एकाच दराने अर्जदारांकडून शुल्कआकारणी करण्यात आली आहे.
मांडवी किनारी भरणाऱ्या अष्टमीच्या फेरीसाठी राज्य-परराज्यातून व्यावसायिकांचे स्टॉल असतात. वास्को येथील दामोदर सप्ताहात स्टॉल घालणारे परराज्यांतील विक्रेते पणजीतील अष्टमीच्या फेरीत स्टॉल थाटतात, हा शिरस्ता आजतागायत कायम आहे. अर्जांच्या खरेदीसाठी शुक्रवारी सकाळी महानगरपालिकेबाहेर जी गर्दी दिसत होती, त्यात परराज्यांतील विक्रेत्यांचा अधिक भरणा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.