Aldona Panchayat Dainik Gomantak
Video

Aldona News: जमीन रूपांतरण, खाजगी जेट्टीला कडाडून विरोध! 'हळदोणे'त ठराव मंजूर

Aldona Gramsabha: हळदोण्यातील अस्तित्वात असलेल्या जेटी वगळता शासकीय किंवा खासगी जागेत कुठल्याही नवीन तात्पुरती किंवा कायमस्वरुपी जेटी उभारणीसाठी अनुमती देऊ नये, असा एकमुखी ठराव हळदोणे पंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Villagers in Aldona Up in Arms Over Land Conversion and Private Jetty Proposal

म्हापसा: हळदोण्यातील अस्तित्वात असलेल्या जेटी वगळता शासकीय किंवा खासगी जागेत कुठल्याही नवीन तात्पुरती किंवा कायमस्वरुपी जेटी उभारणीसाठी अनुमती देऊ नये, असा एकमुखी ठराव हळदोणे पंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

सरपंच आश्‍विन डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली पॅरीस सेंटरमध्ये ही ग्रामसभा पार पडली. यावेळी माजी पंच थॉमस तावारीस यांनी वरील विषयवार मांडलेल्या प्रस्तावावर चर्चेनंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. कॉस्मी फर्नांडिस यांनी या ठरावास अनुमोदन दिले.

थॉमस तावारीस यांनी मांडलेल्या प्रस्तावात पंचायत कार्यक्षेत्रात पर्यटन किंवा इतर कारणास्तव खासगी जेटी उभारण्यास प्रस्ताव पंचायतीकडे सादर करण्यात आलाय का? तसेच विद्यमान जेटीचे विस्तारीकरण केले जाणार का? असा प्रश्न त्यांनी मांडला. त्यावेळी कॉस्मी फर्नांडिस यांनी तसा प्रस्ताव असल्यास, त्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. सत्यवान केरकर यांनी फेरीबोटीचे धक्के जेटी म्हणून ग्राह्य धरले जातात का? असाही प्रश्न केला. यावर सरपंचांनी जेटीसाठी प्रस्ताव पंचायतीकडे सादर झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानतर जेटीला परवानगी न देण्याचा निर्णय ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT